Saturday, May 3, 2025

Jowar Paratha

                                      

                             ज्वारीचा पराठा किंवा दशमी


ज्वारीला जोंधळे असेही म्हणतात याशिवाय याची वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. तिचे प्रकार सुद्धा अनेक आहेत. ज्वारी ही पीक आफ्रिकेतून भारतात आले असे मानले जाते. पण याला फार मोठा काळ लोटला आहे. भारताची व्याप्तीसुद्धा त्यावेळी विस्तीर्ण असावी नंतर देशांमध्ये विभागणी होत होत गेली हे आपल्याला माहित आहेच. ज्वारी आपल्या , विशेषतःग्रामीण भागातील दैनंदिन जेवणाचा अविभाज्य भाग झाली. अर्थात् गेल्या काही दशकात हे चित्र बदलले आहे. 

मध्यंतरी एक ग्रामीण भागातील महिला रुग्णा तपासायला आली तेव्हा हिस्ट्री घेताना तीला आहारात काय असते, भाकरी खाता का? असे विचारल्यावर टी म्हणाली, " भाकरी आवडत नाही आणि सवयही नाही". मी जरा चपापल. कारण टी सोबत तिच्या मुलाला देखील घेऊन आली होती त्यालासुद्धा तपासायचे होते. मग थोडं समजावून सांगितल. मुळात मला प्रश्न असा पडला होता की, जो पदार्थ आई ला आवडत नाही तो ती मुलांना देईल का? ज्याची तिला सवय नाही त्या मुलाला होईल का? आणि मग मूल आयुष्यभर एखाद्या चवीला मुकेल. हे झालं ग्रामीण भागात जिथे भाकरी खाणे common आहे. शहरी भागात तर Junk फूड काळजीचा विषय आहे. अनेक उदाहरणे बघायला मिळतात. असे होईलच असे नसले तरीदेखील याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्याही पलीकडे जे शरीरासाठी योग्य आहे, आवश्यक आहे त्याचा आहारात समावेश व्हायला हवा मग तो वेगवेगळ्या पद्धतीने का होईना. २०२३ मध्ये Millet Year साजरे झाल्यानंतर millets बद्दल जनजागृती झाली. आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने भरपूर पदार्थ तयार केले गेले. Life Style Induced Disorders जसे डायबेटीस, स्थौल्य, थायरोईड, महिलांमध्ये वाढणारे PCOD, Fibroids हे आजार, यासाठी millets चा योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात वापर एक चांगला उपाय असू शकतो. millets हे गुणाने रुक्ष, वातकर असतात त्यामुळे अतिरेक नको आणि त्यासोबत स्निग्ध द्रव्य तेल, तूप घेणे आवश्यक आहे. शिवाय गहू, तांदुळ वैठी नाहीत. योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने सर्वांचेच गुणधर्म चांगले असतात.  

तर २०२३ हे वर्ष मिल्लेत एअर म्हणून साजरे झाले. आणि ज्वारी सुद्धा पुन्हा एकदा मानाने मिरवायला लागली. तिचा भाव वधारू लागला. ते धान्यही आहेच तसे एखाद्या गोष्टीचे फायदे अधिक आणि तोटे फार कमी असतात किंवा ते नियंत्रित करता येण्यासारखे असतात तसंचकाहीसं ज्वारीच्या बाबतीत आहे. अनेक कवी ज्वारीला मोत्याची उपमा देतात.

                                           "या नभाने या भुईलादान द्यावे 
                                            आणि मातीतुनी चैतन्य गावे 
                                           कोणती पुण्ये अशी येती फळाला 
                                           जोंधळ्याला चांदणे  लखडून जावे"

ही निसर्गकवी ना. धो. महानोर यांची कविता या कवितेत ते ज्वारीला चांदणे म्हणतात. खरोखर गोल मोत्यासारखे दाणे असलेल्या ज्वारीचे भरलेले कणीस खूप सुंदर दिसतं आणि संपन्नतेची जाणीव करून देतं. 

ज्वारीची पांढरी शुभ्र, टम्म फुगलेली भाकरी पाहून भूक आपोआप वाढते. पण भाकरी बऱ्याच जणांना आवडते असे नाही, लहान मुले खात नाही किंवा कधी कधी पोळी स्वरूपात हवी असते अशा वेळी खाण्यासाठी एक पदार्थ करता येऊ शकतो ज्वारीचा पराठा किंवा दशमी. उन्हाळ्यासाठी तर हा उत्तम मेन्यू होतो कारण ज्वारी गुणाने थंड आहे त्यामुळे अगदी सकाळचा नाश्ता किंवा रात्रीचे जेवण अशा कोणत्याही वेळी करता येऊ शकतो. चला तर साहित्य, कृती आणि आरोग्यदृष्ट्या उपयोग बघूया. 

साहित्य : 

2 वाट्या ज्वारीचं पीठ

१.५ वाटी पाणी

तूप १ टीस्पून 

तिखट १ टीस्पून

मीठ चवीनुसार

जिरेपूड १ टीस्पून 

ओवा १/२ टीस्पून

                                 

कृती :

सर्वप्रथम एक मोकळ्या भांड्यात कढई किंवा पातेले यात पाणी घेऊन ते गरम करायला ठेवावे.

त्यात ज्वारीचे पीठ सोडून बाकी सर्व जिन्नस एकेक करून घालावे.

भाजीचे पराठे हवे असल्यास यात यावेळी एखादी भाजी पण घालता येऊ शकते.

त्यानंतर पाणी उकळायला लागल्यावर त्यात पीठ घालून चांगले हलवून घ्यावे.

त्यानंतर त्यावर झाकण ठेऊन २-३ मिनीटे वाफ काढून घ्यावी.

त्यानंतर ते थोडे कोमट झाल्यावर तुपाच्या हाताने व्यवस्थित मळून घ्यावे.

नंतर पोळ्यांप्रमाणे लाटून, तव्यावर शेकून घ्यावे. 

हा पराठा गरम असताना त्याला १ छोटा चमचाभर तूप जरूर लावावे. 

आणि चटणी, किंवा भाजीबरोबर सर्व्ह करावे. 

टीप: ज्वारीचे पदार्थ किंवा मिलेट चे पदार्थ आंबट पदार्थाबरोबर जसे टमाट्याची चटणी/ कैरीची चटणी/आवळ्याची चटणी 

                             

कैरी चटणी : 

साहित्य 

एक कैरीचे बारीक तुकडे करून घ्यावे किंवा कैरी किसून घ्यावी.

खडीसाखर ३-४ चमचे/ गूळ 

मीठ चवीनुसार

लाल तिखट १ टीस्पून 

जिरेपूड १ टीस्पून 

                                    

कृती :

कैरी आणि सर्व जिन्नस एकत्रित मिक्सर ला वाटून घ्यावेत. चटणी तयार!

गुण :

ज्वारी गुणाने थंड आहे, पचायला हलकी आहे पण शरीरात रुक्षता निर्माण करणारी आहे त्यामुळे ज्वारीची भाकरी किंवा पोलो, पराठा यावर १ चमचा तूप किंवा घालून खावे हे फार महत्वाचे आहे. ज्वारी  नाहीतर ज्वारी किंवा इतरही millets हे रुक्ष गुणाचे असल्याने ते खाताना त्यासोबत काहीतरी स्निग्ध पदार्थ जसे तूप, किंवा तेल घेणे आवश्यक आहे. असे हे करायला सोपे खाण्यास चविष्ट ज्वारीचे पराठे नक्कीच करून बघा कसे झाले नक्की सांगा! 

मधुमेहींसाठी हा पराठा चांगला आहे

पीसीओडी रुग्णांसाठी हा चांगला आहे

तसेच ज्यांना वजन कमी करायचे आहे पण पोळी टाळायची नाही त्यांच्यासाठी

ज्यांना वारंवार बद्धकोष्ठता जाणवते त्यांनी तूप जरा जास्त  घाला.

                                         

Jowar Paratha 

Jowar is also called Jondhale, apart from this, it has different names in different parts. There are also many types of it. Jowar is believed to have come to India from Africa. But a very long time has passed. The extent of India must have been vast at that time, but later it was divided into countries. Originally, jowar became so popular in our daily lives that it became known as an important food in rural India.

Few days back, when a woman from a rural area came for consultation. I asked her what is her diet while taking history, Do you eat Bhakari? she said, " I don't like Bhakari, not even habitual". I was little shocked. Because she had also brought her child with her for consultation. Then I explained a little. Actually I had a question in my mind, will she give the food that a mother doesn't like to her children? will she be able to create a habit of when she is not habitual to a particular food. That too in rural area where Bhakari is so common whereas in Urban area the junk food is the major cause of worry. It may happen that the child may miss the taste for rest of his life. Although this is not a sure thing, still possibility remains constant. And beyond that, what is good for the body, it is necessary should be included in the diet, whether in different ways.   

After the Millet Year was celebrated in 2023, Jowar once again started being celebrated everywhere. Its use has increased in urban areas as well. This is really good to see. just like it is a grain ,the benefits of something are so many and the disadvantages are very few or they are controllable, and this is the case with Jowar. Many poets compare this beautiful grain with pearls. 

                                        "This sky should give a gift to this land

                                          & the counciousness of the soil should be born,

                                          What virtues come to the fruit

                                           the jowar should be shaken by the stars" 

This is the poem by the nature poet Na.Dho.Mahanor. In this poem, he cslls sorghum the moon. The full grains of Sorghum with round pearls like grains look very beautiful and gives a sense of richness 

Seeing the white, fluffy bread of sorghum, the appetite automatically increases. But bread is not liked by many people, children do not eat it or sometimes it is desired in the form of chapati, at such times, a dish can be made such as sorghum paratha or dashami. This is a great menu for summer because sorghum is cold in quality, so it can be eaten at any time, such as breakfast or dinner. Let's see the ingredients, recipes and health benefits.



Ingredients:

2 cups sorghum flour

1.5 cups water

1 tsp ghee

1 tsp chili powder

Salt to taste

1 tsp cumin powder

1/2 tsp coriander


Recipe:

First of all, take water in a kadhai or pan and heat it.

Add all the other ingredients except sorghum flour one by one.

If you want vegetable parathas, you can also add a vegetable at this time.

Then, when the water starts boiling, add the flour and stir well.

Then, cover it and steam it for 2-3 minutes.

After that, when it is slightly warm, knead it well with ghee.

Then, roll it like a ball and fry it on a tava.

While this paratha is hot, add 1 tsp ghee to it.

And serve with chutney or vegetables.

Note: Sorghum or millet dishes should be served with sour dishes like tomato chutney/kairi chutney/amla chutney


Kairi chutney:

Ingredients

Cut a kairi into small pieces or grate it.

3-4 tablespoons of sugar/jaggery

Salt to taste

1 teaspoon of red chili powder

1 teaspoon of cumin powder

Recipe:

Blend the kairi and all the ingredients together in a mixer. The chutney is ready!

Properties:

Sorghum is cooling in nature, easy to digest but causes dryness in the body, so it is very important to add 1 dollop ghee. Since sorghum or other millets are dry in nature, it is necessary to take some unctous food like ghee or oil with it while eating it.

This paratha is good for diabetic people

It is good for PCOD patients 

Also for those who want to reduce weight but don't want to avoid chapati

Those who feels recurrent constipation make sure to add the extra dose of ghee

Make sure to try these easy to make and delicious sorghum parathas and let me know how it turns out!


(While sharing the article, it is okay to share it with the author's name)


Vaidya Revati Sakhare – Garge

Ayurved Consultant and dietician

Treedal Ayurveda Clinic, Shaniwar Peth, Pune

8010454807

7219899833




No comments:

Post a Comment

Jowar Paratha

                                                                    ज्वारीचा पराठा किंवा दशमी ज्वारीला जोंधळे असेही म्हणतात याशिवाय याची वेग...