Friday, March 27, 2020

Lockdown काळातील नाश्ता

Home Quarantine#Home cooking#Traditional#Healthy food

करोना मुळे सर्व जण घरात बसलेत. अर्थातच महिलांच काम वाढलंय. शिवाय बाहेरून सतत भाजीपाला , फळं फार घेऊ नका असे सांगत आहेत. त्यात भरीस भर म्हणून रेस्टॉरंट swiggy , Zomato सुद्धा बंद आहेत. त्यामुळे बाहेरून मागवण्याचा ही प्रश्न नाही. प्रतिकारशक्ती,पोट सुद्धा सांभाळायची आहेत. एकंदरीत खूप तारांबळ उडते आहे. कदाचित गडबड वाढेलही. त्यासाठी आपण घरी उपलब्ध असलेल्या समग्रीतून पदार्थ तयार करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूयात. त्यासाठी काही पारंपरिक पाककृती सांगते. सर्वजण घरी म्हटल्यावर किमान तीन वेळा तरी स्वयंपाक घरात जावे लागते. हो ना ! मग या काही पाककृती आपण आवडीनुसार , पद्धतीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्यासाठी करू शकतो.

१) मिश्र पीठांचे फुंणके
२) उकडपेंडी
३) तांदळाची उकड
४) मुगाची उसळ
५) साळीच्या लाह्यांचा चिवडा
६) ज्वारीच्या लाह्या भिजवून पोह्यांप्रमाणे
७) साळीच्या लाह्या ताकात भिजवून गोपलकाल्याप्रमाणे
८) तुरीचे फुणके
९)हरभरा डाळीचे फुणके
१०)मुगाचे धिरडे
११)ताजे गोड दही व साबुदाणा
१२)शेवयांचा उपमा
१३)ज्वारीचा पिठाचा उपमा
१४)कणिक आणि गुळाचा शीरा भरून तूप घालून
१५)भेळ - कांदा,टोमॅटो,कैरी,काकडी घालून
१६)कोथिंबीर वडी
१७)मिश्र भाज्यांची टिक्की
१८)हिरव्या मुगाचे कढण
१९)तिखट मीठ पुरी
२०) उपमा
२१) सातूचे पीठ - गूळ व पाणी घालून/ तिखट मीठ घालून आवडीनुसार

असे पुढील लेखामध्ये जेवणाचे पदार्थसुद्धा बघूया. या वर्गांच्या जोडीला वेगवेगळी सरबतही घेऊ शकतो. ती सांगितलेलीच आहेत की!!

वैद्य रेवती गर्गे
त्रिदल आयुर्वेद क्लिनिक.

होळी रे होळी पुरणाची पोळी

                                                          होळी रे होळी  पुरणाची पोळी                                होळी रे होळी पुरणाची पोळ...