Saturday, April 7, 2018

रस गोडी तैसा स्वाद...रसाला..!


                                                                      ब्रह्मकर्म समाधिना.....!


                                               सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! आणि
                                               दिनविशेष म्हणजे जागतिक आरोग्य दिनाच्या आरोग्यमयी शुभेच्छा !!
                                               मी वैद्य सौ रेवती गर्गे आजपासून इंटरनेट च्या चावडीवर म्हणजे ब्लॉग च्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे आणि विषय अगदी तुमच्या माझ्या आवडीचा आहे. तसं नाव वाचून थोडाफार अंदाज आला असेलच...! अगदी बरोबर "खाणे"...!
                                                हो ना? आहे ना आवडता विषय..? हं बरं मग याठिकाणी आपण बघणार आहोत आयुर्वेदाच्या काही आहार पद्धती. अहो आयुर्वेद म्हणजे फक्त जडी बुटी नाही. तर आपल्या या प्राचीन शास्त्रात
 सर्व गोष्टीचा विचार केला गेलाय.  अगदी सकाळी उठल्यापासून काय करावे काय खावे कसे खावे इ.
                                               
                                                                 स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् |
                                                                 आतुरस्य विकारप्रशमनम् ||

                                                 म्हणजेच काय तर स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे व आजारी व्यक्तीचा विकार दूर करणे.  आणि म्हणूच आयुर्वेदात काय करावे काय करू नये, काय खावे काय खाऊ नये, इ  गोष्टींचा उत्तम विचार मांडलेला आहे. आजकाल बदललेली दिनचर्या आणि बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी (दुर्दैवाने यांचे  inverse relation आहे) यामुळे अनेक आजारांना खुले निमंत्रण आहे. म्हणून आपण थोडा विचार करून आपल्या आहाराच्या  काही सवयी बदलणे किंवा काही नवीन लावून घेणे ही काळाची गरज आहे. आपल्या आयुर्वेदात अशा खूप छान छान पौष्टिक recipes सांगितलेल्या आहेत किंवा काही आपल्या नेहमीचे पदार्थ  करण्याची पद्धत थोडी वेगळी सांगितली आहे. इतकेच नाही तर त्याचे गुणधर्म काय आहेत त्याचा शरीरावर काय परिणाम होतो हेदेखील सांगितलेले आहे.
                                                  जेवण किंवा अन्नसेवन हे केवळ उदरभरण नाही तर हे एक यज्ञकर्म आहे. असे साक्षात् समर्थ रामदासांनी सांगितलेले आहे. भगवद्गीतेत ब्रह्मकर्म सांगितलेले आहे. बरोबरच आहे की, आपले पोट म्हणजे काय dustbin आहे का? आपण काय खातो त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो अपाय होतो कि फायदा होतो कि उपाय? हे आपल्याला माहित नको?
                                                   आजकाल तर आपल्यासमोर किती किती options असतात. "खाण्यासाठी जन्म आपुला" म्हणतच चाललाय कि सगळं. पण... असं करत असतांना आपण अनेकदा अशाही गोष्टी खात पीत असतो ज्याचा शरीराला फायदा कमी अन् तोटाच अधिक असतो.
                                                     यज्ञ करताना आहुती देताना आपण पेट्रोल किंवा रॉकेल का नाही वापरत? त्यानेही तर अग्नी प्रज्वलित होतच की...भडकाच होतो उलट. की ज्या काळात यज्ञपद्धती सांगितली गेली त्या काळात या गोष्टी माहित नसतील असं वाटत? नाही...उलट ते ऋषीमुनी सर्वज्ञानी होते. सृष्टीचा अभ्यास त्यांचा अधिक होता. परंतु गोघृत वापरण्यामागचे कारण असे की, ज्याप्रमाणे गोघृत सात्त्विक आहे, शुभ आहे त्याप्रमाणे यज्ञाचे फलित प्राप्त व्हावे. शिवाय जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने आपल्या शरीरातही अग्नी असतो जो अन्नपचनाचे काम करत असतो त्याचाही भडका होऊ द्यायचा नसतो की विझुही द्यायचा नसतो तर हळुवारपणे फुलवायचा असतो. पण काही खाताना आपण एवढा विचार करतो का...??
                                                        परंतु अनादि काळापासून आपल्या संस्कृतीत असा विचार केला गेलेला आहे. याठिकाणी आपण असेच काही व्यंजन बघणार आहोत ज्याचे आयुर्वेदात वर्णन केलेले आहे. त्याचे गुणधर्म बघूया शिवाय त्याचे काही modifications किंवा प्रकार असतील तर त्याचाही अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. उदा; आजकालचे trendy Ready to eat किंवा खोलो-घोलो-पिलो सारखे पदार्थ आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम होतो हेही बघण्याचा प्रयत्न करूया.
                                                       
                                                                    श्रीखंड भाग १
                                                     
                                                          सुरुवात काहीतरी sweet dish ने करावी म्हणून श्रीखंड.  श्रीखंड हा गुजरात व महाराष्ट्रीयन पदार्थ मानला जातो. महाभारतात भीमाने श्रीखंडाचा शोध लावला असे मानले जाते. महाभारतात अशी एक कथा आहे की एकदा श्रीकृष्ण भीमाला भेटायला गेले तेव्हा भीमाने त्यांना रसाला अर्थात् श्रीखंड खायला दिले. ते श्रीकृष्णाला खूप आवडले. ते त्यांनी भरपूर खाल्ले आणि बलवान झाले.
                                                     
  • आंबट दही विशेषकरून म्हशीच्या दुधापासून तयार केलेले दही घ्यावे. 
  • दह्याची  पुरचुंडी बांधून रात्रभर उंचावर टांगून ठेवावे ( त्यातील पूर्ण पाणी निघून जावे हा उद्देश).
  • त्या दह्यातील पूर्ण पाणी निघून गेल्यारच त्याला खाली येण्याची परवानगी  द्यावी.
  • त्यात साखर अं हं खडीसाखर बारीक करून घालावी.
  • त्यानंतर ते मस्त फेटून घ्यावे.
  • त्यात चवीला वेलायची, किंचित मिरे, जायफळ, घसघशीत सुकामेवा घालावे. किंचित् केशराचा केशरिया रंग श्रीखंडाचे सौंदर्य आणखी खुलवेल.
       
    
      कथेमध्ये श्रीखंडाचे जसे गुण सांगितलेले आहेत तसेच ते आहे.
  • जे कृश असतील त्यांना ग्रीष्म आणि शरद ऋतू मध्ये बाल देणारे आहे.
  • वात आणि पित्ताच्या तक्रारी दूर करते.
  • तहान, जळजळ ई वर उपयुक्त.
  • चक्का बल देणारा, साखर पित्तनाशक, मिरे व विलायची रुचीकर व पचनास मदत करणारी आहे. 
  • पुढील भागात आपण श्रीखंडाचे वेगवेगळे प्रकार पाहूया.  


                                                       

                                                  

21 comments:

  1. खूपच सुरेख लेख. ओघवती भाषाशैली. नवीन माहिती मिळाली.

    ReplyDelete
  2. छान लेख. नवीन माहिती मिळाली. असेच लिहीत जावे. शुभेच्छा !

    ReplyDelete
  3. मस्त ... keep writting 👍

    ReplyDelete
  4. खूप छान माहिती आहे. गोड पदार्थ प्रथम सेवन करण्याच्या शास्त्र संकेतानुसार श्रीखंडाची प्रथम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद व शुभेच्छा

    ReplyDelete
  5. खूप छान माहिती आहे. गोड पदार्थ प्रथम सेवन करण्याच्या शास्त्र संकेतानुसार श्रीखंडाची प्रथम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद व शुभेच्छा

    ReplyDelete
  6. खुप छान लेख... शुभेच्छा...��

    ReplyDelete
  7. खुप छान लेख... शुभेच्छा...��

    ReplyDelete
  8. अर्थात अप्रतिम!

    ReplyDelete
  9. खुप छान लेख आहे. शुभेच्छा👍

    ReplyDelete
  10. खुप छान लेख आहे. शुभेच्छा👍

    ReplyDelete

होळी रे होळी पुरणाची पोळी

                                                          होळी रे होळी  पुरणाची पोळी                                होळी रे होळी पुरणाची पोळ...