Saturday, July 25, 2020

गव्हाची खीर




आषाढ अमावस्येनंतर ऊन सावलीचा खेळ सुरू होतो. त्यानंतर श्रावणाला सुरुवात होते आणि सणावारांची  रांगच लागते. त्यापैकीच आज नागपंचमी. 

कृष्ण आणि अर्जुनाने नवीन राजधानी निर्माण करण्यासाठी खांडववन जाळले. त्यामध्ये अनेक नाग मारले गेले आणि म्हणून नागराज तक्षकला  अर्जुनाचा सूड घ्यायचा होता. 

या उद्देशाने त्याच्या वंशातील परीक्षित राजा ला तक्षकाने मारले. यावर संतप्त होऊन परीक्षित राजा च्या मुलाने म्हणजे जनमेजयाने सर्पसत्र सुरु केले, यज्ञामध्ये सापांची आहुती देण्यास सुरुवात केली. तेव्हा आस्तिकाने मध्यस्थी करून ते थांबवले.

म्हणून नागाच्या प्रजातींचा वंश वाचला. आणि तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमी. 
तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते. 

याशिवाय लोकोत्तर प्रचलित नागीण आणि तिच्या पिल्लांची कथा आपल्या सर्वांनाच माहीत आहे. 
म्हणून आज काही कापू, भाजू नये, लोखंड वापरू नये अशी मान्यता आहे. 

याशिवाय सापाचे विशेष महत्व शेतात असते. आणि जो आपल्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मदत करतो त्याच्याप्रति कृतज्ञता असावी ही आपली संस्कृती आहे.
तर अशी नाग पंचमी ची वैशिष्ट्ये आहेत.

नागपंचमी भारतात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान याठिकाणी साजरी केली जाते.
नेपाळ मध्ये नागपंचमीचे विशेष महत्व आहे.

आजच्या दिवशी अनेक ठिकाणी पुरणाची दिंडी, उंडे, गव्हाची खीर, कान्हवले, कोकणात हळदीच्या पानातील पातोळ्या करण्याची पद्धत आहे. 

माझ्या माहेरी आणि सासरी नागपंचमी गव्हाची खीर करण्याची पद्धत आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही खीर अत्यंत लाभदायक आहे . म्हणून आज आपण गव्हाची खीर कशी करायची आणि गुणधर्म काय आहेत ते बघूया.


गव्हाची खीर :

पूर्वतयारी :

गहू धुऊन वाळवून घ्यावे व नंतर जाडसर दळून घ्यावे. मिक्सर ला सुद्धा व्यवस्थित होते.



साहित्य :

दळलेले गहू 1 वाटी
गूळ 1/2 वाटी (साखरेऐवजी पूर्ण गूळ सुद्धा घालता येऊ शकतो)
साखर1/2 वाटी
विलायची पूड पण चमचा
जायफळ 1 चिमूटभर/ दुधात उगाळून
खोबऱ्याचे काप किंवा किस 
दूध ( आम्ही वैद्य लोक देशी गायीचे दूध सांगतो)



कृती :

1. गहू  साधारण 2 ते 2.5 वाटी पाणी घालून कुकर मध्ये 3-4 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यावे.

2. त्यानंतर भांड्यामध्ये गरम असतानाच गूळ आणि साखर घालून उकळून घ्यावे.




3. त्यानंतर त्यामध्ये विलायची पूड, जायफळ, ड्राय फ्रूट्स घालवे.

4. आयत्या वेळी कोमट दुध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.




गुण :

गव्हाची खीर अतिशय पौष्टीक आहे. लहान मुले, कृश व्यक्ती, गर्भवती महिला, वृद्ध अशा लोकांना ज्यांना शरीराचे पोषण अपेक्षित आहे अशा वेळी उत्तम आहे.

श्रावणात अनेक उपवास असतात म्हणून सुरुवातीला शरीराला एनर्जी चा साठा आपण पुरवू शकतो.

याशिवाय या ऋतू मध्ये वात वाढलेला असतो, पित्त साठण्यास सुरुवात झालेली असते म्हणून षड्रसांपैकी मधुर, अम्ल , लवण म्हणजेच गोड, आंबट, खारट हे रस शरीराला आवश्यक असतात .अर्थात् प्रमाणातच. यामुळे वाताचे शमन होते. 

हाडांचेही पोषणही चांगले होते.

विलायची , जायफळ ही प्रक्षेप द्रव्ये असतात ती पदार्थाची चव, सुगंध वाढवतात याशिवाय ते पदार्थ पचण्यास सुद्धा मदत करतात.
गव्हाची खीर पचण्यास थोडी जड असते यासाठी ज्यांना पचनास विलंब होत असेल त्यांनी यामध्ये किंचित सुंठ पावडर, लवंग किंवा मिरेपूड घालून खावी.

आज अनेकांच्या घरी गव्हाची खीर असेलच आणि नसेल तर ती या ऋतूत आवर्जून करून खा.

#traditionalsweet #shravan&health #healthytasty #cookathome #stayhomestaysafestayhealthy

Sunday, July 19, 2020

घ्या काळजी स्वतः ची...तेव्हाच देश जिंकेल कोरोनाशी

              

कसे काय आहात मंडळी काळजी घेताय ना....घेतोय म्हणजे काय....घ्यायलाच हवी..!

सध्या सगळीकडेच पाऊस बऱ्यापैकी सुरू झालाय. हवामान खात्यानेही पावसाची शक्यता वर्तवली आहे.
एरवी सुद्धा वातावरण बदललं की सर्दी , खोकला, ताप इ रुग्णांची संख्या वाढते. अशा वेळी healthcare system वरचा load वाढणार आहे. कारण कोण COVID -19 चा रुग्ण आणि कोणता साधा सर्दी खोकला हे निदान कठीण होणार आहे.
परंतु पॅनिक न होता थोडा patience सर्वांनीच बाळगायला हवा आहे.
प्रत्येकाला आपल्याला कोरोना आहे की काय अशी शंका येणे स्वाभाविक आहे. ताप आला किंवा सर्दी झाली तरी अंगावर काढू नये परंतु व्याकुळ होऊनही चालणार नाहीये.
होऊ नये यासाठी प्रयत्न करावा.

 गरम पाणी पिण्यात असू द्या. 

पुदिन्याची पाने/ ओवा टाकून पाण्याची वाफ घ्या.

 दूध हळद घ्या. 

हळद, मीठ कोमट पाण्याच्या गुळण्या करतच असणार, चलने दो !

आयुष काढा घ्या. आयुष काढा विचार करताना अनेक ज्येष्ठ वैद्य एकत्र येऊन त्यांनी विचारपूर्वक अगदी घराघरात उपलब्ध असणारी घटक द्रव्ये सांगितलेली आहेत. त्यामागे एक विचार आहे. कोणत्याही गोष्टी चे सेवन करताना प्रमाण किती असावे याला खूप महत्व आहे. काढा कसा घ्यावा याची माहिती अजूनही नीट समजलेली नसेल तर आपल्या वैद्यांना, जवळपास असलेल्या वैद्यांना जरूर संपर्क करा अथवा दिलेल्या नंबर वर किंवा ई-मेल id वर संपर्क करा.

योगासन, प्राणायाम  करा.

Lockdown मुळे अनेकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. त्याचाही तणाव येऊ शकतो. परंतु हे सामान्यपणे प्रत्येकाच्याच आयुष्यात असणार आहे. 

शिवाय यानंतर अनेक पर्याय उपलब्ध देखील असणार आहेत. यासंदर्भात cunselling ची सुद्धा आपण मदत आपल्या जवळच्या लोकांकडून घेऊ शकतो किंवा आमचा नंबर आहेच. थोडक्यात मनावर ताण येणार नाही असा प्रयत्न करा.

अजूनही एसी, कूलर वापरत असाल तर तो बंद करा. बाहेर जाणे टाळा, टाळणे शक्य नसेल तर पुरेशी काळजी घेऊनच बाहेर पडा. अर्थातच मास्क, faceshield, handgloves. Supermarket किराणा घेत असाल तसेच भाजी घेताना सुद्धा hand gloves वापरा. कारण अनेक जण ती हाताळत असतात.

 या काळात सांध्यांची दुखणी पण डोक वर काढतात. खास करून ज्येष्ठ नागरिक, ज्यांना सांधेदुखी आहे अशा लोकांनी नियमित तीळ तेल कोमट करून त्याची  मालिश करावी. व सहन होईल इतक्या गरम/कोमट पाण्याने अंघोळ करावी जेणेकरून त्रास कमी होईल. सर्वांनीच शक्य असल्यास या काळात अंघोळी पूर्वी संपूर्ण अंगाला तेलाची मालिश करायला हरकत नाही. आठवडाभर जमत नसेल तर weekend ला करा.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपला आहार ! 

या काळात पचनशक्ती जरा नाजूक असते. म्हणून हलका आहार घ्यावा. मुगाची खिचडी, मेतकूट भात, दूध भात, पोळी, भाकरी, शक्यतो फळ भाज्या, मुगाचे कढण, आमसुलाचे सार भात किंवा खिचडी,दलिया इ. पदार्थ आहारात घ्या.
एखादे वेळी ठीक आहे परंतु वारंवार तेलकट पदार्थ नको.

मैदा, ब्रेड, पाव,बिस्कीट,इ पदार्थ टाळावे. 

जेवणापूर्वी आल्याचा छोटासा तुकडा आणि सैंधव खावे. यामुळे भूक चांगली लागून पचनही चांगले होते. परंतु हे करण्यापूर्वी आपल्या वैद्यांना विचारून घ्या.

झोपण्याच्या किमान 1.5-2 तास आधी रात्रीचे जेवण घ्यावे. रात्री पुरेशी झोप घ्यावी आणि दुपारी झोपू नये. 

यातील बऱ्याचशा गोष्टी आपल्याला यापूर्वीही सांगितलेल्या असतील . आतापर्यंत आपण त्या पाळतही असूं. काही नसतील तर त्या  आता करूयात.

डॉक्टर दवाखान्यात आहेतच परंतु आपल्याला वारंवार दवाखान्यात जावे लागणार नाही. आणि संक्रमणाचा धोका टाळता येईल. कारण दवाखान्यात आपल्या सारखेच अजूनही patients असतातच की!
आणि एवढे करूनही सर्दी, खोकला झालाच, लवकर बरे नाही वाटले तर डॉक्टर/ वैद्यांशी संपर्क करा. कारण साधा सर्दी खोकला आणि Covid19 टेस्ट केल्याशिवाय नाही लक्षात येणार.

आपण इतके दिवस सर्व गोष्टी नेटाने पाळल्या आहेत. हा काळ तर अधिक महत्वाचा आहे. त्यामुळे थोडी आणखी काळजी घेऊया आणि आपली आपल्या जीवलगांची काळजी घेऊया.

Image Source : Google



#corona #COVID-19 #gocorona # Immunitybooster#AyushKadha #Healthyolifestyle #Healthydiet #StayHomeStaySafeStayHealthy



त्रिदल आयुर्वेद क्लिनिक, जळगांव.
7219899833
treedalayurvedclinic@gmail.com

Friday, July 10, 2020

अळू वडी ( Alu Vadi)

                       आला आला वारा....संगे पावसाच्या धारा.... असा छान आशाजींच्या आवाजात गण सुरुये आणि हातात चटपटीत, खमंग काहीतरी आहे आणि एकीकडे चहाचा कप आहे. आहा! क्या बात..! स्वर्गसुख च जणू....बाहेर छान थोड थंड हवा आभाळ अस वातावरण असता मधूनच पाऊस अस असतांना अनेक चटपटीत पदार्थ खुणावू लागतात. पण ग्रिष्मातले चटके सोसल्यावर आपला पोटातला अग्नी काही अजून खूप फुललेला नसतो. शरीरात पित्त साठत असते. पचनशक्ती थोडी कमजोर झालेली असते. वातदोष बळावलेला असतो. शिवाय दुषित पाणी वातावरणातील ओलसरपणा यामुळे बाहेरचे अन्न दुषित असते. त्यामुळे ते खाल्ल्याने पोट बिघडते.आणि आता तर  बाहेरचे खाण्याचा प्रश्नच  येेेत नाही. सध्या सगळंच घरीच करायचं आहे. म्हणून यावेळी १ अशीच माहित असलेली आणि  सर्वांना आवडणारी  अशी recipe बघूया.



                                   अळू वडी

अळू :

अळू चा कंद असतो. त्याचे अनेक प्रकार आहेत. त्याची हृदयाकृती पाने असतात. 

त्यापैकी वांगी आणि हिरव्या रंगाचे खाण्यासाठी उपयुक्त असतात. हे बहुवर्षायू असते.घराच्या परसबागेतही छान जगतो आणि दिसतोही सुरेख!

महाराष्ट्रात पूर्वीपासून लग्नामध्ये अळूचे फदफदे अर्थात् अळूची पातळ भाजी करण्याची पद्धत आहे.

चिंच आणि गुळ घालून चविष्ट भाजी होते.

साधारणत: भारतातल्या वेगवेगवेगळ्या सर्वच भागात अळूचे विविध व्यंजन आवडीने केली जातात. आणि त्याची वेगवेगळी नावे सुद्धा आहेत.

बिहार मध्ये "ऐरकांचन" असे सुंदर  नाव आहे !

तर उत्तर प्रदेशात "साहिना" नावाचा पदार्थ केला जातो. अळू वडी किंवा भजे असाच तो प्रकार असतो.

अळूचा कंद सुद्धा अतिशय पौष्टिक असतो.           

अळूचे पान काळ्या देठाचे घ्यावे. ते गुणांनी चांगले असते.

Calium oxalate crystals मुळे घसा खवखवण्याची शक्यता असते. म्हणून पदार्थ करताना त्यात चिंच घालावी म्हणजे घसा खवखवत नाही. 

 

साहित्य आणि कृती :
   

अळूची पाने

डाळीचे पीठ/मुगाचे पीठ ( मी मुगाचे पीठ घेतले आहे)  

तांदळाचे पीठ

मीठ व साखर/ गुळ चवीनुसार

जिरे पुड

हिंग

कडीपत्ता,

तिखट

हळद,

तीळ

ओवा

चिंचेचा कोळ


कृती :

१) अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावीत. देठ काढून टाकावे. त्यावर लाटणे फिरवावे जेणेकरून पान सपाट होईल व त्यावर पीठ लावणे सोपे होईल.
२) एका भांड्यात डाळीचे पीठ व इतर सर्व साहित्य मिसळून भज्यांच्या पिठापेक्षा घट्ट होईल इतपत पाणी घालावे.

३) त्यानंतर सर्वात मोठे अळूचे पान घ्यावे. त्यावर पीठ लाऊन घ्यावे.त्यानंतर त्यावर दुसरे पान उलट ठेवावे. त्यावर  पुन्हा पीठ लाऊन घ्यावे. याप्रमाणे ४-५ पाने लाऊन घ्यावीत.

४) त्यानंतर त्याची गुंडाळी करून टोकाच्या बाजूनेही पीठ लाऊन घ्यावे.

५) एका पातेल्यात पाणी उकळत ठेऊन त्यावर चाळणी ठेऊन त्यावर पानांची घडी ठेऊन दोन्ही बाजूनी वाफवून घेऊन थंड करून वड्या 
कापून घ्याव्यात.


६) 
नंतर वड्या लोखंडी तव्यावर किंवा लोखंडी कढईमध्ये तेलावर परतवून घ्याव्यात.

 

गुण :

 अळू : 

शरीरास बल देणारा आहे, स्निग्ध असल्याने शरीरास स्निग्धता पुरवते. पचण्यास काहीसा जड, आहे हृदयातील अतिरिक्त कफ कमी करणारा आहे, तेलात तळलेले अत्यंत रुचकर आहे, गुणाने थंड आहे, जठराग्नी प्रदीप्त करणार आहे.यामध्ये विटामिन एबी 1,विटामिन सीतसेच फॉस्फरस असते, कॅल्शीअम, लोह असते. कंदामध्ये    विटामिन अ , ब१, सी असते. carbohadrates, proteins असतात. इतर स्टार्च असणार्या पदार्थांपेक्षा      

लवकर पचते. बटाट्यापेक्षा १.५ पट अधिक पौष्टिक आहे. लहान मुलांसाठी देखील उपयुक्त , शक्ती देणारा असा आहे.

हरभरा डाळ पीठ 

वातकारक, रुक्ष असते.     

मुगाचे पीठ :   

काहीसे वात वाढवणारे परंतु शितल आणि बळ देणारे आहे.

तीळ : 

बल देणारी आहे जाठराग्नी वाढवणारी आहे वातशामक आहे . आणि उष्ण आहेतम्हणून तीळ    उन्हाळ्यात खाऊ नये. तरी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हरकत नसते परंतु प्रमाण योग्य असावे.

कडीपत्ता : 

अग्निदीपन करणारापाचक आणि आहे  पोषक असतो

धणेपूड : 

जाठराग्नी प्रदीप्त करणारी  पचनशक्ती वाढवणारी आहे.

जिरेपूड :

भूक वाढवते, पचन सुधारते. वाताचे अनुलोमन करते म्हणजे वाताला अधो मार्गास प्रवृत्त करते. जेणेकरून पोट साफ होण्यास मदत होते. 

असे सर्व पदार्थ एकत्रितरित्या एकमेकांच्या गुण दोषांना सांभाळून घेतात. अळू पचायला काहीसा जड असला तरी ओवा, जिरेपूड ,कडीपत्ता पचनासाठी मदत करतात. तीळ व तेल यांमुळे डाळीची रुक्षता कमी होण्यास मदत होते. धणे पित्ताला नियंत्रित करतात. असा सर्व विचार आपल्या पारंपरिक पदार्थांमागे दडलेला असतो. आणि त्याचीच आपल्या शरीराला सवय असते. म्हणून पारंपरिक पदार्थांना प्राधान्य द्या आणि निरोगी रहा!

Ayurvedcooking #Ayurvedrecipes #TreasureofAyurved #Healthydiet #Healthyeating

#Healthylifestyle #Cookathome #StayHomeStaySafeStayHealthy

 

वैद्य रेवती गर्गे

त्रिदल आयुर्वेद क्लिनिक, पंचकर्म सेंटर, जळगाव.

( लेख नावासह शेअर करण्यास हरकत नाही.)

 

Sunday, July 5, 2020

दुग्ध कुपी

                      

                                      

                                                                 

 
                                       आज अगदीच वेगळ्या पद्धतीची रेसिपी बघणार आहोत       आपण.  एखादी अत्तराची कुपी उघडावी आणि घरात सुगंध दरवळतो. तशी ही कूपी आपण खाताना लक्षात येईल आतमध्ये दडलय काय? साहित्य आणि कृती बघूया आणि मग गुणांकडे जाऊया.

पूर्वतयारी :

खवा :

आधी आपल्याला खवा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी १ लिटर दुध मंद आचेवर उकलण्यास ठेवावे. मधून मधून हलवावे. दुध-बासुंदी-रबडी-खवा असा त्याचा प्रवास होऊन खवा तयार होतो.

                                                               
                                                               
                                  खवा(Khoya)           
          
          रबडी :

त्यानंतर आपल्याला अर्धा ते पाऊण लिटर दुध स्वतंत्र आटवायचे आहे. त्यामध्ये विलायची पूड,जायफळ,केशर, जायफळ, काजू बदाम पूड, साखर चवीनुसार. व रबडीप्रमाणे घट्ट होईपर्यंत आटवावे.    

                               

                   

                             रबडी(Rabri)
                                                           

साहित्य:

( प्रमाण आपण वाटी किंवा कप घेऊ त्यानुसार आहे.)

रवा ( गव्हाचा असल्यास उत्तम) १ कप ( २ भाग)

तूप १ मोठा चमचा आणि जवळपास १.५ कप तळणासाठी

तांदळाचे पीठ १/२ कप ( १ भाग )

खवा साधारण १.५ कप

रबडी १.५ कप

खडीसाखर १.५ कप

केशर ७-८ काड्या

विलायची पूड १/४ चमचा

जायफळ चिमुटभर

भीमसेनी कपूर चिमुटभर

मैदा १ चमचा

 

कृती :

१)      रवा आणि तांदळाचे पीठ तूपाचे मोहन घालून पाणी घालून भिजवून घ्यावे.

                                   

२)      उकडीचे मोदक करताना पारी करतो त्याप्रमाणे करून वाटीसारखा आकार करावा.

                                            

३)      व हे सर्व तयार झाल्यानंतर तळून घ्यावे.

                              
 

४)      थंड झाल्यावर यामध्ये रबडी भरून घ्यावी.

                                                     

५)      फक्त खवा व्यवस्थित तळला जात नाही म्हणून यामध्ये थोडा मैदा घालून चांगले मळून घ्यावे.

६)      कुपी बंद करण्यासाठी खव्याची जाडसर पारी करावी.

७)      आता हे तयार झाले आपल्या कुपीचे झाकण.

८)      आता हे आपल्या कुपीवर घट्ट बसवावे ( एकदम airtight बरं का!)

९)      मी एक खव्याचा छोटासा गोल आकार करून झाकणावर बसवलाय.

१०)    याप्रमाणे सर्व तयार करून घ्यावे.

                                
 
    ११)   त्यानंतर ही आपली कुपी तूपात खरपूस तळून घ्यावी.
                          
                   

१२)    एकीकडे खडीसाखर व पाणी घालून गुलाबजामसारखा पाक करून घ्यावा.

१३)    पाक गरम असताना त्यामध्ये केशर७-८, विलायची छोटा पाव चमचा, जायफळ १ चिमुटभर,   किंचीत् भीमसेनी कापूर घालावा. गॅस बंद करून झाकण ठेवावे.

१४)    आपल्या तळलेल्या कुपी थंड झाल्या की पाक कोमट झाल्यावर त्यात पाकात घालाव्या.

१५)    ४-५ तासात छान मुरतात. मग खाऊन बघा दुग्ध कुपी.

 

   गुण :

१)      वातपित्तशमन करणारी आहे.

२)      बलकारक

३)      गुणाने थंड

४)      पचण्यास थोडी जड

५)      तृप्त करणारी आहे

६)      रुचकर

७)      शरीरास पुष्ट करणारी

८)      डोळ्यांसाठी हितकर

९)      वृष्य

 

 

Dugdh Kupi (Milk Cruets)

              Yeah! you heard right its dugdh kupi that means the cruet that contains milk. How is it possible, let’s see.

Preparation:

Khoya :

Boil 1 litre milk till its becomes thick i.e. Khoya.

Rabri :

To prepare rabri we have to boil half litre milk till we get little bit thick consistence. Keep stirring. Add sugar as per your taste while boiling. Add pinch of cardamom powder, pinch of nutmeg powder, 4-5 sticks of saffron, almond, cashews, pistachios powder 1 tbsp. U can add powdered mixture of all these.

Ingredients:

( Here i’m using a cup, U can use bowl but the measurement should be constant.)

Semolina ( Its better if its homemade) 1 cup ( 2 part)

Ghee 1 tbsp and required for frying about 1.5 cup ( Cow ghee should always be preferred)

Rice flour ½ cup ( 1 part )

Khoya 1.5 cup

Rabri 1.5 cup

Rock sugar or candy sugar 1.5 cup ( commonly known as mishri)

Saffron 7-8 sticks

Cardamom powder ¼ teasp

Nutmeg powder ¼ teasp

Bhimseni Kapoor

Allpurpose flour 1 tbsp

 

 

Recipe :

           ( Please refer pictures above). 

1)      Mix semolina & rie flour, add 1 tbsp ghee, mix well and gradually add water, start kneading a softer dough. 

2)      Take a small portion, roll it like chapati. Then give it a small bowl like shape as shown in picture.

3)      Prepare all. Then deep fry in ghee. Keep them aside. Let it cool. These are our cruets.

4)      Fill rabri in fried cruets.

5)      It’s a bit tedious to fry khoya only. Hence we are going to add a tbsp of all purpose flour in khoya. Knead well.  

6)      To close our cruets we are going to make cap of Khoya. Just take a small porstion roll over your palm. Just press it.

7)      Then fix the cap over our fried cruets, filled with rabri. Fix it properly so that milk should not leak.   

8)      I have fixed a very small round of Khoya on cap just to get a cruet shape.

9)      Prepare all.

10)  Then again fry these full cruets in ghee.   

11)  By the side we have to make Sugar Syrup i.e. Chasani. For that take rock sugar in a pan. Add ¾ or a glass of water, see we dont want it too thick or too liquid, check consistency and keep water as much.

12)  Add cardamom powder ¼ teaspoon, nutmeg powder 1 pinch, saffron 7-8 sticks, bhimseni kapur ½ pinch. Turn off the flame.

13)  Let cruets cool down, then add them into lukewarm sugar syrup.

14)  Let it rest for 4-5 hours. Serve then. Enjoy a new delicious sweet recipe.

15)  I hope this unique, healthy sweet recipe will gladden your taste buds.

16)  So just try it & let me know your feedback.  

गुण :

1)      Regulates vitiated vaat, pitta.

2)      Strengthening

3)      Cooling the body

4)      Hard to digest ( Hence keep in mind while taking your food)

5)      Satisfies to mind and body.

6)      Delicious.

7)      Nourishes body

8)      Enhances eyesight

9)      Aphrodisiac

 #Ayurvedcooking #Ayurvedrecipes #TreasureofAyurved #Healthydiet #Healthyeating

#Healthylifestyle #Cookathome #StayHomeStaySafeStayHealthy

Wednesday, July 1, 2020

बहुगुणी कोहळा

                                             
 खूप दिवसांनी पुन्हा एकदा भेटत आहोत. कोहळा आपल्या सर्वांच्या ओळखीचा परंतु गुनंवाये कमी माहित असलेला. कोहाल्याला संस्कृत मध्ये विदारी कुष्मांड असे म्हणतात. देवीच्या पूजेच्या वेळी कोह्ल्याव्र राक्षस रेखून त्याला मारण्याची अप्द्धात प्रचलित आहे. म्हणजेच कोह्ल्याला आहारीय, औषध व धार्मिक असे तिहेरी महत्व आहे.
                                                हे काकडी कुळातील फळ आहे. भोपळ्यासारखे दिसणारे हे फळ अंडाकृती आहे व हिरवे असते. पूर्णपणे पिकलेला कोहळा वापरावा. कच्चा कोहळा निषिद्ध मनाला जातो.
                                                 ज्याच्या बीजात किंचितहि उष्णता नाही. असा हा कुष्मांड म्हणजेच कोहळा गुणांनी थंड आहे. याची वेळ असते. ग्रीष्म ऋतूत फळे येतात. निसर्गाची किमया खरोखर सुंदर असते. वातावरणातील अपायकारक बदलांवर मात करण्यासाठी निसर्ग फळे, भाज्या, यांची योग्य निर्मिती करत असतो. कोहळा गुणाने थंड असल्याने आम्लपित्ताचा त्रास असणार्याने, उन्हाळ्यात घोलना फुटण्याची तक्रार असणार्यांनी आहारात ठेवावा. धातुपुष्टीकार असल्याने वाढत्या वयातील मुलांना लाभदायक आहे. यात fibres प्रमाण अधिक असते.
                                                                     
                                                                        कोहळ्याचे  वडे
                                                                कोहाल्याची भाजी, सूप, रायता, तसेच आग्र्याचा सुप्रसिद्ध पेठा कोहाल्यापासुंच बनवला जातो.

साहित्य :
उडदाची डाळ
हिंग
जिरे
कडीपत्ता
मीठ
कोहळा
तिखट
धणेपूड
आले
कोथिंबीर

कृती :

उडदाची डाळ रात्रभर भिजवणे.
वाटून घेणे.
कोहळ्याची  साल व बिया काढून किसून घेणे.
वाटलेल्या डाळीमध्ये हिंग, मीठ, तिखट, ई. गोष्टी मिसळून कोह्ल्याचा किस मिसळून घ्यावा.
व याचे छोटे छोटे वडे तोडून घ्यावे व उन्हात वाळवावे. याला सांडगे असेही म्हणतात.

वाळल्यानंतर तेलावर shallow fryकरून खाता येतील.

गुण :
थंड असल्याने उन्हाळ्यात उत्तम आहे.
बलवर्धन करणारा आहे.
गर्भिणींनी सेवन केल्यास बाळाचे पोषण चांगले होते.
पाण्याचा अंश अधिक असल्याने शरीरास लाभदायक आहे.
पित्त व रक्त विकार दूर करतो.

वैद्य  रेवती गर्गे
त्रिदल आयुर्वेद क्लिनिक, जळगाव.




                                                 

होळी रे होळी पुरणाची पोळी

                                                          होळी रे होळी  पुरणाची पोळी                                होळी रे होळी पुरणाची पोळ...