Thursday, May 1, 2025

काय वाढले पानावरती!

                 


महाराष्ट्राच्या साहित्य इतिहासातील एक सोनेरी पान म्हणजे "गीत रामायण" हे ज्यांनी लिहिले असे महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणजेच ग. दि. माडगूळकर. त्यांचीच एक कविता म्हणजे "काय वाढले पानावरती" अतिशय सुंदर कविता.! 

गदिमा एकदा एका लग्नाला गेले असताना पान वाढून होईपर्यंत त्यांना ही कविता सुचली. पण या कवितेत त्यांनी जसा काही महाराष्ट्रीयन पारंपरिक पाककृतींचा खजिनाच रिता केला आहे. साधारणतः सर्वच महाराष्ट्रीयन घरांमध्ये यातील वेगवेगळ्या पाककृती दैनंदिन जीवनात, सणावाराला, काही विशेष प्रसंगी केल्या जातात. त्याचाच धांडोळा घेण्यासाठी आमच्या या ब्लॉग वर आम्ही "काय वाढले पानावरती.!" हे एक सदर सुरू करत आहोत. यामध्ये कवितेत आलेल्या खाद्यपदार्थांबद्दल ऊहापोह करणार आहोत. त्याची आरोग्यदृष्ट्या उपयुक्तता मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून आपल्या पारंपरिक पदार्थांचे आयुर्वेदीय दृष्टिकोनातून शास्त्रीय विवेचन व्हावे एवढाच यामागे उद्देश आहे. याबद्दल आम्ही वेळोवेळी माहिती पुरवू परंतु काही मिस होऊ नये यासाठी तुम्हीदेखील आमच्या ब्लॉग ला नक्की subscribe करा. आणि ही कल्पना कशी वाटली आम्हाला नक्की सांगा.

(लेख शेअर करताना लेखिकेच्या नावासह शेअर करण्यास हरकत नाही)


वैद्य रेवती साखरे – गर्गे

आयुर्वेद चिकित्सक आणि आहारतज्ञ

त्रिदल आयुर्वेद क्लिनिक , शनिवार पेठ, पुणे

8010454807

7219899833


No comments:

Post a Comment

Jowar Paratha

                                                                    ज्वारीचा पराठा किंवा दशमी ज्वारीला जोंधळे असेही म्हणतात याशिवाय याची वेग...