Sunday, July 19, 2020

घ्या काळजी स्वतः ची...तेव्हाच देश जिंकेल कोरोनाशी

              

कसे काय आहात मंडळी काळजी घेताय ना....घेतोय म्हणजे काय....घ्यायलाच हवी..!

सध्या सगळीकडेच पाऊस बऱ्यापैकी सुरू झालाय. हवामान खात्यानेही पावसाची शक्यता वर्तवली आहे.
एरवी सुद्धा वातावरण बदललं की सर्दी , खोकला, ताप इ रुग्णांची संख्या वाढते. अशा वेळी healthcare system वरचा load वाढणार आहे. कारण कोण COVID -19 चा रुग्ण आणि कोणता साधा सर्दी खोकला हे निदान कठीण होणार आहे.
परंतु पॅनिक न होता थोडा patience सर्वांनीच बाळगायला हवा आहे.
प्रत्येकाला आपल्याला कोरोना आहे की काय अशी शंका येणे स्वाभाविक आहे. ताप आला किंवा सर्दी झाली तरी अंगावर काढू नये परंतु व्याकुळ होऊनही चालणार नाहीये.
होऊ नये यासाठी प्रयत्न करावा.

 गरम पाणी पिण्यात असू द्या. 

पुदिन्याची पाने/ ओवा टाकून पाण्याची वाफ घ्या.

 दूध हळद घ्या. 

हळद, मीठ कोमट पाण्याच्या गुळण्या करतच असणार, चलने दो !

आयुष काढा घ्या. आयुष काढा विचार करताना अनेक ज्येष्ठ वैद्य एकत्र येऊन त्यांनी विचारपूर्वक अगदी घराघरात उपलब्ध असणारी घटक द्रव्ये सांगितलेली आहेत. त्यामागे एक विचार आहे. कोणत्याही गोष्टी चे सेवन करताना प्रमाण किती असावे याला खूप महत्व आहे. काढा कसा घ्यावा याची माहिती अजूनही नीट समजलेली नसेल तर आपल्या वैद्यांना, जवळपास असलेल्या वैद्यांना जरूर संपर्क करा अथवा दिलेल्या नंबर वर किंवा ई-मेल id वर संपर्क करा.

योगासन, प्राणायाम  करा.

Lockdown मुळे अनेकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. त्याचाही तणाव येऊ शकतो. परंतु हे सामान्यपणे प्रत्येकाच्याच आयुष्यात असणार आहे. 

शिवाय यानंतर अनेक पर्याय उपलब्ध देखील असणार आहेत. यासंदर्भात cunselling ची सुद्धा आपण मदत आपल्या जवळच्या लोकांकडून घेऊ शकतो किंवा आमचा नंबर आहेच. थोडक्यात मनावर ताण येणार नाही असा प्रयत्न करा.

अजूनही एसी, कूलर वापरत असाल तर तो बंद करा. बाहेर जाणे टाळा, टाळणे शक्य नसेल तर पुरेशी काळजी घेऊनच बाहेर पडा. अर्थातच मास्क, faceshield, handgloves. Supermarket किराणा घेत असाल तसेच भाजी घेताना सुद्धा hand gloves वापरा. कारण अनेक जण ती हाताळत असतात.

 या काळात सांध्यांची दुखणी पण डोक वर काढतात. खास करून ज्येष्ठ नागरिक, ज्यांना सांधेदुखी आहे अशा लोकांनी नियमित तीळ तेल कोमट करून त्याची  मालिश करावी. व सहन होईल इतक्या गरम/कोमट पाण्याने अंघोळ करावी जेणेकरून त्रास कमी होईल. सर्वांनीच शक्य असल्यास या काळात अंघोळी पूर्वी संपूर्ण अंगाला तेलाची मालिश करायला हरकत नाही. आठवडाभर जमत नसेल तर weekend ला करा.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपला आहार ! 

या काळात पचनशक्ती जरा नाजूक असते. म्हणून हलका आहार घ्यावा. मुगाची खिचडी, मेतकूट भात, दूध भात, पोळी, भाकरी, शक्यतो फळ भाज्या, मुगाचे कढण, आमसुलाचे सार भात किंवा खिचडी,दलिया इ. पदार्थ आहारात घ्या.
एखादे वेळी ठीक आहे परंतु वारंवार तेलकट पदार्थ नको.

मैदा, ब्रेड, पाव,बिस्कीट,इ पदार्थ टाळावे. 

जेवणापूर्वी आल्याचा छोटासा तुकडा आणि सैंधव खावे. यामुळे भूक चांगली लागून पचनही चांगले होते. परंतु हे करण्यापूर्वी आपल्या वैद्यांना विचारून घ्या.

झोपण्याच्या किमान 1.5-2 तास आधी रात्रीचे जेवण घ्यावे. रात्री पुरेशी झोप घ्यावी आणि दुपारी झोपू नये. 

यातील बऱ्याचशा गोष्टी आपल्याला यापूर्वीही सांगितलेल्या असतील . आतापर्यंत आपण त्या पाळतही असूं. काही नसतील तर त्या  आता करूयात.

डॉक्टर दवाखान्यात आहेतच परंतु आपल्याला वारंवार दवाखान्यात जावे लागणार नाही. आणि संक्रमणाचा धोका टाळता येईल. कारण दवाखान्यात आपल्या सारखेच अजूनही patients असतातच की!
आणि एवढे करूनही सर्दी, खोकला झालाच, लवकर बरे नाही वाटले तर डॉक्टर/ वैद्यांशी संपर्क करा. कारण साधा सर्दी खोकला आणि Covid19 टेस्ट केल्याशिवाय नाही लक्षात येणार.

आपण इतके दिवस सर्व गोष्टी नेटाने पाळल्या आहेत. हा काळ तर अधिक महत्वाचा आहे. त्यामुळे थोडी आणखी काळजी घेऊया आणि आपली आपल्या जीवलगांची काळजी घेऊया.

Image Source : Google



#corona #COVID-19 #gocorona # Immunitybooster#AyushKadha #Healthyolifestyle #Healthydiet #StayHomeStaySafeStayHealthy



त्रिदल आयुर्वेद क्लिनिक, जळगांव.
7219899833
treedalayurvedclinic@gmail.com

No comments:

Post a Comment

होळी रे होळी पुरणाची पोळी

                                                          होळी रे होळी  पुरणाची पोळी                                होळी रे होळी पुरणाची पोळ...