Thursday, April 21, 2022

नारळाची खीर ( Coconut Payasam)

                                 नारळाची खीर







                                          

        नारळ नाव ऐकताक्षणी प्रत्येकासमोर आपापल्या आवडीचा पदार्थ डोळ्यासमोर येत असणार! शिवाय भारतीय संस्कृतीत पूजेमध्ये पहिला मान गणपती बाप्पाचा असतो तसा पूजा साहित्यामध्ये नारळाचा! खरच नारळाच्या झाडालासुद्धा कल्पवृक्ष असे म्हणतात . "कल्पवृक्ष म्हणजे जे जे इच्छा करू ते देणारा" अर्थात् नारळाच्या झाडाच्या प्रत्येक गोष्टीपासून काही ना काहीतरी तयार होते ज्यावर मनुष्य आपला उदरनिर्वाह करू शकतो. 

         नारळाचे अनेक पदार्थ कोकणात तसेच दक्षिण भारतात प्रसिद्ध आहेत. यावरून नारळाला "दाक्षिणात्य" असाही एक नाव आहे. याशिवाय अत्यंत प्रसिद्ध अशा "थाई" डिशेस मध्ये नारळ, नारळाचे दुध याचा वापर विशेष करून असतो. मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारा इंडोनेशिया हा देश नारळाच्या निर्यातीत पहिल्या क्रमांकावर आहे. नारळाचे बालरूप म्हणजे कच्च्या फळापासून ते खोबरे, मग त्याचे तेल यापर्यंत त्याचे अनेक फायदे आहेत. 

         नारळातील मगज काढून त्यावर अनेक वेळा प्रक्रिया करून तयार केलेले " Virgin Coconut Oil" म्हणून सध्या skincare साठी चांगलीच प्रसिद्धी मिळवते आहे. नारळ पाणी गर्भावस्थेत वारंवार पिण्यात येते पण खरे त्याचे योग्य प्रमाण किती असावे त्यासाठी वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा. नारळाचे दुधही युक्तिपूर्वक वापरले तर कसे उपयोगी ठरू शकते यावर एकदा स्वतंत्र लिहीन. 

          साधारणत: रक्षाबंधन अर्थात् नारळी पौर्णिमेला नारळाची खीर, वड्या , भात करण्याची पद्धत असते.  नारळ गुणाने थंड  असल्याने उन्हाळ्यात करून घेण्यास उत्तम आहे. असो! नमनाला घडीभर (नारळाचे) तेल पुरे झाले.! तर आता आपल्या रेसिपीकडे वळूया. 


साहित्य :

दुध १ कप

नारळाचा जव किंवा कीस १/2 कप

साखर १/3 कप

काजू बदाम काप १ टेस्पून

मनुका १ टेस्पून

विलायची  पूड १/४ चमचा

जायफळ १/४ चमचा

दालचिनी १/२ सेमी

तूप १ टेस्पून

             



कृती : 

१. प्रथम  एका भांड्यात तूप घालून खोबर्याचा कीस / जव खरपूस भाजून घ्यावा

२. आता यामध्ये साखर घालून छान परतावे

३. यात दुध घालून चांगले उकळू द्यावे

४. काजू, बदाम, मनुका यावेळी घालू शकता किंवा आवडीनुसार तुपात घालू शकता

५. शेवटी त्यामध्ये दालचिनी पूड, जायफळ, विलायची पूड घालून  gas बंद करावा

                     


गुण :

नारळ गुणाने थंड असल्याने उन्हाळ्याच्या तडाख्यात हे  dessert उत्तम आहे.

अत्यंत चवदार असते.

तसेच पौष्टिक आहे शरीराला ताकद देणारे आहे. मांस धातूचे पोषण करणारे आहे.

केसांसाठी उत्तम आहे

पचायला काहीसे जड असल्याने त्यातील विलायची इ. पदार्थ ती पचनासाठी मदत करतात.

विलायची, जायफळ, दालचिनी, लवंग इ, मसाल्याच्या पदार्थांचा गोड पदार्थांमधील वापर ही आयुर्वेदाची वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनाआहे. गोड पदार्थ पचण्यास काहीसे जड असतात तर हे मसाल्याचे पदार्थ उष्ण आणि तीक्ष्ण गुणाचे असतात त्यामुळे याचा योग्य मात्रेत केलेला वापर  उदरातील अग्नि  प्रदीप्त करून अन्न पचवण्यास मदत करतात. जेणेकरून पदार्थांमधील मूळ घटकद्रव्यांचे  शरीरात अपेक्षित असे कार्य  घडून येण्यास मदत होते. शिवाय या मसाल्यांच्या ठिकाणी असलेल्या सुगन्धामुळे अन्नालाही एक  विशिष्ट सुगंध , चव येते  ज्यामुळे पदार्थ खाण्याची इच्छा जागृत होते. त्यामुळे मन आणि शरीर तृप्त होते.

मसाल्यांच्या तेज तर्रार तर्रीपेक्षा, यापद्धतीनेI केलेला वापर अधिक फायदेशीर आहे.

केवळ एक काळजी अशी की या पदार्थांमध्ये एक विशिष्ट प्रकारचे तेल असते जे अधिक तापमानावर उडून जाते म्हणून पदार्थ तयार झाल्यानंतर शेवटी हे पदार्थ घालावे व त्यांनते पदार्थ फारसे गरम करू नयेत. 

Diabetes असणाऱ्या व्यक्ती साखर वगळून घेऊ सहजता नारळाच्या ठायी मुळात एक गोडवा असल्याने ती तशीही चवदार होते.

                                                     

                           Coconut Payasam

       Coconut! everyone must be thinking about his favourite recipe in mind. Among Indian culture there is holy ritual to Worship Lord Ganesha first. Likewise  almost in every worship ritual grocery list the first place is devoted for Coconut, ain't it?. Coconut tree is known as "Kalpvriksh" that means "the tree gives you,what you desire". Every part of the tree is useful for preparing something that a person can make his bread & butter, hence the name.

         Cuisines made by using coconut is stapel food in Konkan and South India. Besides coconut especially coconut milk is predominantly used in very famous Thai dishes.  Due to abundance Indonesia is a leading country in Coconut export. Coconut is useful at every phase of its growth & development. 

          " Virgin Coconut Oil" made from fresh coconut is getting a big fame for Skincare. Coconut water is frequently taken during pregnancy, it is advisable to consult an Ayurved physician for frequency & doses.  Cooking is really an Art, and we can use coconut milk artistically for greater results. I would surely love to write it down for some other day. 

            It is a holy ritual to prepare coconut delicacies like payasam, burfis, rice during Rakshabandhan or Narali Paurnima. Being cool in nature Coconut dishes are good for consuming during summers. I think, there is lot of information we have collected about coconut, more I would love to get it from your side. Lets now move to our recipe.


Ingredients :

Milk 1 cup

Grated fresh coconut 1/2 cup

Sugar 1/3 cup

Cashews, Almond pieces 1 tbspoon

Raisins 1 tbspoon

Cardamom powder 1/4 tspoon

Nutmeg powder 1/4 tspoon

Cinnamon 1/2 cm

Cowghee 1 tbspoon


Procedure :

1.  Add ghee in a vessel , saute the grated coconut

2. Add sugar

3. Saute for  a minute

4. Add milk, let it boil for fee minutes

5. Add dry fruits , or you can add at 1st step in ghee also

6. Add powdered cardamom, nutmeg & cinnamon, switch off the flame


Properties :

Coconut is cool in nature hence it can be a good dessert option in summers.

It's very delicious.

Balances Vata & Pitta.

It strengthens the body as well as nourishes Mamsa dhatu.

It acts as hair tonic.

This payasam is little hard to digest, therefore the ingredients like cardamom, etc will help to digest it.

The use of spices in sweet dishes is a distinctive quality of Ayurveda. Sweets are hard to digest. Spices are having Ushna & Tikanga properties & the use of these spices in proper quantity helps to ignite the intestinal fire. That helps to digest the sweets & one can get an expected benefit from the food. Besides this spices has a particular flavor  & aroma, which stimulates the hunger & providing satisfaction to the mind and body.

It is always better to use the spices in this way rather than hot, spicy curries and gravies.

Only the thing to keep in mind the spices loose it's flavor & aroma at high temperature, due to destruction of volatile oils & active principles in them.



Dr.Revati Gadge

Tree dal Ayurveda,

8010454807

( Feel free to share the post with  due credits to the author)


1 comment:

होळी रे होळी पुरणाची पोळी

                                                          होळी रे होळी  पुरणाची पोळी                                होळी रे होळी पुरणाची पोळ...