Thursday, May 27, 2021

लहान मुले, कोरोना आणि प्रतिकार शक्ती


            कोरोनाची दुसरी लाट कशी तरी कमी होते न होते तोच तिसरीची  चर्चा सुरू झाली. त्यात लहान मुलांना अधिक धोका आहे अस म्हटलं जातंय. मुळात संसर्ग हा लहान मुलांसाठी वेगळा , व्हायरस वेगळा अस काही नसणारेय. जी काळजी घेत आलोय ती घ्यायची आहेच. परंतु विशेष काळजी अशी की बालवय हा कफ प्रधान्याचा काळ असतो. म्हणून लहान मुलांना लवकर सर्दी खोकला होतो. छातीत कफ लवकर वाढतो. त्यात येणार काळ हा पावसाळा, त्यांनतर हिवाळा असा आहे. अशा वेळी कफ वाढू नये म्हणून काळजी घ्यायला हवी.

१) प्रतिकार शक्ती वाढवावी म्हणून जे काही ऐकण्यात येईल, अनेक advertsements वाढतील तर अशा कोणत्याही गोष्टीचा मारा करू नका.

२) प्रोटीन shakes च्या नावाखाली तत्सम मिल्क पॉवडर्स, प्रोटीन shakes, मिल्क shakes, smoothies, oats अशा कोणत्याही गोष्टी देऊ नका.

३) बाहेरचे चिप्स, वेफर्स, कुरकुरे, ब्रेड, बिस्किट्स, नूडल्स, बाहेरचे sauses, cheese, बटर्स, केक, कोल्डड्रिंक्स चालू असतील ते बंद करा.

४) आंबवलेले पदार्थ, इडली, डोसा, ढोकळा महिन्यातून एकदाच असा नियम ठरवा.

५) कडधान्य वारंवार नको. 

6) दूध पूर्णान्न आहे असा गैरसमज मनातून सपशेल काढून टाका, का? तर अस नसतं आणि हल्लीचे दूध तर नाहीच नाही.

७) ताकद यावी  म्हणून फळ येन केन प्रकारेण ते खाल्ले गेले पाहिजे , मग मिल्क शेक्स असो, किंवा ज्यूस, smoothies, अशा प्रकारे नकोच नको.

८) चोकॉलेट्स healthy नक्कीच नाहीत , त्यामुळे ती टाळलेलीच बरी. 

         वर सांगितलेल्या गोष्टी पचवण्याची क्षमता लहान मुलांची नसते. आणि ताकद यावी म्हणून, प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून, अनेक गोष्टींचं मारा आपण करत असतो. आणि कळत न कळत त्याचा फायदा होण्याऐवजी विपरीत परिणाम होतो. वरील गोष्टी जरा तपशिलाने समजावून घेऊया. 

१) Food इंडस्ट्री ही खूप मोठी आहे. त्यात लहान मुलांचा विषय आला की त्यात एक emotional touch येतो आणि तिथे गडबड  होते. त्यामुळे आशा काही पावडर्स पासून मुलांना आधीपासूनच परावृत्त करायला हवे. त्याऐवजी सुंठ, विलायची, हळद, अश्वगंधा ,शतावरी चूर्ण घालून गरम दूध देत येईल यामुळे आवश्यक ते पोषण मिळेल.

२) Smoothies करताना अतिशय deadly combinations असतात. पालक, क्रीम, मध, मीठ अस काही. मुळात जो पदार्थ आपण लहानापासून, परंपरेने खात आलेलो आहोत तो त्याच पद्धतीने घ्यावा. त्या पद्धती tested OK आहेत. आणि हे सगळं करताना अपण घेतलेले पदार्थ मुळात एकमेकांना विरुद्ध होऊन शरीरावर विपरीत परिणाम करतात. मोठ्यांच्या शरीरावर सुद्धा याचा परिणाम होतो तर त्या कोवळ्या जीवांच्या नाजुक पचनशक्तीचे काय होणार? तर जो पदार्थ आपण जसा करत आलेलो आहोत तसाच खा. नवीन रेसिपी सापडली तरी करताना ती किती योग्य याची शहानिशा करून मग करा.

३) बाहेरच्या चिप्स, वेफर्स मध्ये फ्लेवर्स येण्यासाठी अनेक flavoring agents, colours, artificial powders, preservatives मिसळलेले असतात. ज्यामुळे ते चटकदार होतात आणि पुन्हा पुन्हा खावेशे वाटतात. हे सगळं शरीरासाठी अर्थातच घातक असतात. आणि हे शिळेसुद्धा असतात! शिवाय ब्रेड, पण, बिस्कीट, केक यामध्ये मैद्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे ते रुक्ष पचायला जड असतात यामुळे पचनशक्तीचे तक्रारी वाढून इतर आजारांना कारणीभूत ठरतात. म्हणून ताज्या करून खाण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. वेगवेगळे चिवड्यांचे प्रकार, साळीच्या लाह्यांचे पदार्थ, चिक्की, लाडूचे प्रकार, खोबरे, मीठ,जिरेपुड सारण घालून कणकेचे ड्राय कचोरी समोसे करू शकतात, वेगवेगळे फुणके हे तुम्ही नाश्ता आणि मधल्या वेळच्या खाण्यासाठी करू शकतात.

४) आंबवलेले पदार्थ तयार होताना आम्ल गुण वाढून रक्ताला दूषित करतात त्यामुळे ते वारंवार नको. ब्रेड, पण, बिस्कीट, केक हे सुद्धा यातच मोडतात. त्याऐवजी भाज्यांचे पराठे गायीच तुप लावून, फुणक्यांचे प्रकार, दलिया, खिरी, वेगवेगळे ना आंबवता दही ना घालता केलेले धिरडे, सूप,असे करू शकतात. 

५) मोड आलेले कडधान्य पचायला जड , वातूळ होतात. त्यामुळे सारखे नको. त्याऐवजी हिरवे मूग आज भिजवून उद्या उसळ करून त्यावर हवं तर थोडी शेव, कांदा टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू पिळून द्या.

६) शरीराच्या पोषणासाठी सर्व रस आवश्यक असतात. दूध हे मधुर म्हणजे गोड रस प्राध्यान्याने असणारे आहे. पचायला काहीसे जड. गायीचे म्हशीपेक्षा तुलनेने पचायला जड आहे. काही मुलांची पचनशक्ती मुळात कमजोर असते पोट नीट साफ होत नाही, नीट जेवत नाहीत आणि मग पोट भरावे म्हणून दूध दिले जाते आणि तिथेच गडबड होते. अग्नी मंद असताना दुधही नीट न पचता त्याचे रूपांतर कफात होते.  त्यात हल्लीच्या दुधात भेसळ खूप असते. तर जेव्हा अग्नी मंद असताना मुलांना भाताची पेज, ज्वारीची, रव्याची पातळ पेज, हिरव्या मुगाचे कढण असा आहार घ्यावा.अगदी लहान बालकांसाठी जे अन्न घेत नाही त्यावेळी मातेचा आहार योग्य असावा.अशावेळी या सर्वांसाठी वैद्यांचा सल्ला जरूर घ्या.

७) फळे देताना ती त्या ऋतूत येणारी, ताजी द्यावी दूध आणि फळे विरुद्ध आहेत. Smoothies दिल्या जातात त्यावेळी विरुद्ध गुणांचे पदार्थ एकत्र केले जातात यामुळे शरीरातील दोष विपरित रित्या वाढून पोषण ना होता आजाराला कारणीभूत ठरतात. म्हणून seasonal ताजी फळे द्यावीत शक्यतो चावून खावीत. अगदी लहान मुलांना न देणे योग्य पण दिल्यास रस करून पचेल आशा मात्रेत अगदी चिमूटभर विलायची पूड/सुंठ पूड/ मिरे पूड घालून द्यावी. हल्ली फळांवर खूप फवारणी असते म्हणून सेंद्रिय घेतल्यास उत्तम! आवळ्याचे च्यवनप्राश, मोरावळा इ जरूर द्या.

८) चॉकोलेट  healthy या क्षेत्रात मानले जात असले तरी ते योग्य नाही. शरीराला अँटीऑक्सिडंट असा एकमेव गुण अवश्यक नाही.  क्वचित् ठीक परंतु वारंवार नको. 

लहान मुलांना आजच्या काळात ads मुळे खूप प्रलोभन असतात. रंगबेरंगी आकर्षक पॅकिंग मुळे ती घ्यावीशी वाटतात. पण त्यातील पोषणमुल्ये नगण्य असतात. म्हणून त्यांना वेळीच परावृत्त करावे. कारण याकाळात लागणाऱ्या सवयी चिरकाल टिकणाऱ्या असतात. आणि हे सर्व  जर नेहमी सांभाळले तर प्रतिकारशक्ती नक्कीच अबाधित राहील. हे कोरोनाविरुद्धचे युद्ध कठीण आहे. परंतु त्याचा सामना युक्तीनेच करावा लागणार आहे. आपल्या घरातच या सगळ्याच गमक दडलंय. 

आपल्याला याबद्दल काहीही शनक असल्यास आम्हाला जरूर संपर्क करू शकतात.

#kidsdiet#healthydiet#


वैद्य सौ. रेवती गर्गे,
त्रिदल आयुर्वेद, जळगांव. 
treedalayurved@gmail.com
8010454807

( पोस्ट लेखिकेच्या नावासह शेअर करण्यास हरकत नाही. )

 



            

 



No comments:

Post a Comment

होळी रे होळी पुरणाची पोळी

                                                          होळी रे होळी  पुरणाची पोळी                                होळी रे होळी पुरणाची पोळ...