Friday, April 4, 2025

सुंठवडा/ Sunthvada

                                                                   सुंठवडा

                  रामनवमी निमित्त सुंठवडा करण्याची पद्धत अनेक ठिकाणी असते. बऱ्याच मंदिरात, घरोघरी प्रसाद म्हणून सुंठवडा केला जातो. याला पंजिरी असेही म्हणतात. पंजाब मध्ये सुद्धा पंजिरी केली जाते. पण तिची पद्धत जरा वेगळी आहे. 

                     आपले सणवार आणि निसर्गचक्र हातात हात घालूनच चालतात. रामनवमी चैत्र महिन्यात येते. यावेळी वसंत ऋतू असतो. ऊन तापायला सुरुवात झालेली असते. आधीच्या ऋतुमध्ये वाढलेला कफ या ऋतुंमध्ये आयुर्वेदातील पंचकर्म शोधन प्रक्रियेने प्रकृती आणि व्यक्तीनुसार बाहेर काढणे अपेक्षित असते. यासाठी आयुर्वेद तज्ञांचे मार्गदर्शन , सल्ला घेता येऊ शकतो. याच काळात भूक , पचनशक्ती जरा मंदावते. पुढे येणाऱ्या ऋतुंमधील उष्णतेने पित्त वाढू शकते हे सगळे रोखण्यासाठी सणावारांना वेगवेगळ्या पद्धतीने खाद्यपदार्थ, पेय करण्याच्या प्रथा रूढ झालेल्या दिसून येतात. तसाच एक प्रकार म्हणजे सुंठवडा.! कसा करायचा हे समजून घेऊया.! नावातच सुंठ असल्याने सुंठ हा महत्वाचा घटक आहे हे साहजिकच आले. ऋतुसंधीच्या काळी आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते. राम नवमी आणि जन्माष्टमी साधारण अशा ऋतुसंधी काळी च येतात. जन्माष्टमी ला सुद्धा सुंठवडा करण्याची पद्धत दिसून येते. 

                    सुंठ आयुर्वेदीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे औषध. हिला विश्वभेषज असेही म्हटलेले आहे. संपूर्ण विश्वाच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी अशी ही विश्वा! आले ठराविक प्रक्रियेने वाळवून सुंठ तयार केली जाते. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये विशेष बदल होतो तो गुणांमध्ये आयुर्वेदामध्ये एक संकल्पना आहे "संस्कारो हि गुणांतर्धानम्" अर्थात् संस्काराने गुणांमध्ये बदल होतात. हे खरे तर व्यवहारातही दिसून येते. जसे कुंभार मातीचे घडे तयार करतो, एक विशिष्ट प्रकारे ते घडवले जाते, आकार देऊन भट्टीत भाजले जाते. ते ते वापरण्यायोग्य होते. लहान मुलावर संस्कार करून  एक चांगले व्यक्तिमत्व घडवता येते. तसेच संस्काराचे महत्व आहे. आहारामध्ये तर विशेष आहे. अशीच प्रक्रिया आले आणि सुंठीबाबत घडून येते. आले पूर्वी गुणांनी उष्ण, कटुविपाक असतो तर वाळवून , काळाचा संस्कार झाल्यावर सुंठ मधुर विपाकी म्हणजे आल्यापेक्षा सौम्य गुणाची होते. आणि या ऋतूसाठी सुसह्य होते. सुंठ आमाचे म्हणजे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनपद्धतीमुळे म्हणजे lifestyle मुळे तयार होणारे विषार शरीरात वेगवेगळे व्याधी निर्माण करण्याकरिता कारणीभूत ठरतो ते टाळण्याचे काम सुंठ उत्तमरित्या करते. म्हणून  सुंठ या पद्धतीने वापर करणे हा यामागील विचार आहे. 

सुंठवडा/पंजिरी :

साहित्य: 

सुंठ पावडर  १ टेस्पून / १० ग्रॅम 

खडीसाखर १.५ टेस्पून / १५ ग्रॅम 

धने  १.५ टेस्पून / १५ ग्रॅम 

खोबऱ्याचा किस/ पातळ काप १.५ टेस्पून / १५ ग्रॅम 

ओवा १/२ टेस्पून / ५ ग्रॅम

विलायची १/२ टेस्पून / ५ ग्रॅम

कृती : 

धने आणि खोबरे हलके भाजून घ्यावे. 

खडीसाखर अगोदर थोडी बारीक करून घ्यावी.

 आता सर्व घटक एकत्रित करून मिक्सर मध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यावे. 

सुंठवडा किंवा पंजिरी तयार ! 

सुंठवडा पुढचे निदान ७ दिवस एक छोटा चमचाभर जेवणानंतर किंवा सकाळी नाश्त्यानंतर खाता येऊ शकतो. 

बडिशेपेसोबतही खाण्यास हरकत नाही.

सुंठ : भूक वाढणारी, उत्साहवर्धक, आहे.

धने : त्रिदोषशामक

खडीसाखर : पित्तशामक

ओवा : कफ कमी करणारा, अन्नपचनास उपयुक्त , काहीसा पित्त करणारा म्हणून पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी काळजी खाताना काळजी घ्यावी

विलायची : चव आणि भूक वाढवणारी ,पित्त कमी करणारी

अशाप्रकारे सणवार आणि रूढी परंपरा यामागे शास्त्रीय कारणे असतात. ऋतु, निसर्ग यांचा बारकाईने विचार केलेला असतो त्यामुळे ते समजून घेऊन आपण ते जपायला हवे. जेणेकरून आपण आरोग्यपूर्ण आयुष्य जगू शकतो. 

प्रभू श्रीराम उत्तम आरोग्य प्रदान करो.!

रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा.! 


Sunthvada :


There is a tradition of making Sunthavada on the occasion of Ram Navami in many places. In Maharashtra Sunthavada is pepared as a prasad in many temples, and almost every household. It is also called Panjiri. Panjiri is also made in Punjab. But its method is a little different. Sunthvada is prepared during Janmashtami also. When there is change in Season it tends to fall sick during the time. This kind of rituals are set to follow to face the transit and increase the immunity & helps to prevent falling sick. 


Our festivals and natural cycles go hand in hand. Ram Navami is celebrated in the month of Chaitra. At this time, it is spring. The heat has started to heat up. The kaph dosh that has increased in the previous season is expected to be removed in these seasons according to the nature and the individual through the Panchakarma Shodhan process of Ayurveda. For this, the guidance and advice of Ayurveda experts can be taken. During this period, appetite and digestion slow down a bit. To prevent all this, the practice of making food and drinks in different ways has become common during festivals. One such type is Sunthavada.! Let's understand how to do it.!

How to prepare:

1 tbsp roasted Dry coconut,

1 tbsp roasted Coriander seeds(Dhaniya)

1 tbsp Candy sugar

1/2 tbsp Dry ginger powder

1/2 tbsp Ajwain

Grind them together.

One can have Sunthvada  atleast for next 7 days after meals, 1/2 tsp (like Prasad).


Benefits:

Coconut: Gives energy, reduces pitta.

Coriander seeds: Balances all three doshas.

Candy sugar: reduces body heat, controls excess thirst

Dry ginger: Reduces lethargy, increases intestinal fire.

Ajawain: Reduces excess kapha, good for digestion. Those having pitta prakruti should be careful about consumption


May Shriram bless all with good health and prosperity!



(लेख शेअर करताना लेखिकेच्या नावासह शेअर करण्यास हरकत नाही)

(When sharing the article, please include the author's name)


वैद्य रेवती साखरे – गर्गे

आयुर्वेद चिकित्सक आणि आहारतज्ञ

त्रिदल आयुर्वेद क्लिनिक , शनिवार पेठ, पुणे

8010454807

7219899833

No comments:

Post a Comment

Jowar Paratha

                                                                    ज्वारीचा पराठा किंवा दशमी ज्वारीला जोंधळे असेही म्हणतात याशिवाय याची वेग...